IPL च्या इतिहासातील CSK चे सर्वात मोठे पराभव

Pranali Kodre

CSKला पराभवाचा धक्का

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा धक्का बसला.

CSK | IPL 2025 | Sakal

सलग पाचवा पराभव

चेन्नईचा हंगामातील सलग ५ वा पराभव ठरला. तर घरच्या मैदानातील सलग तिसरा पराभव ठरला.

CSK | IPL 2025 | Sakal

५९ चेंडू राखून पराभव

कोलकाताने चेन्नईला ८ विकेट्स आणि ५९ चेंडू राखून पराभूत केले.

CSK | IPL 2025 | Sakal

सर्वात मोठा पराभव

त्यामुळे चेन्नईसाठी हा आयपीएलमधील चेंडूंच्या तुलनेतील सर्वात मोठा पराभव देखील ठरला आहे.

CSK | IPL 2025 | Sakal

दुसरा मोठा पराभव

यापूर्वी चेन्नईने २०२० साली शारजाहमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ४६ चेंडू राखून पराभवाचा सामना केला होता.

CSK | IPL 2025 | Sakal

तिसरा मोठा पराभव

२०२१ साली पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला दुबईत ४२ चेंडू राखून पराभूत केले होते.

CSK | IPL 2025 | Sakal

चौथा मोठा पराभव

दिल्ली कॅपिटल्सने २०१२ साली चेन्नईला दिल्लीमध्येच ४० चेंडू राखून पराभवाचा धक्का दिला होता.

CSK | IPL 2025 | Sakal

पाचवा मोठा पराभव

चेन्नईने २००८ साली मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडू राखून पराभव पत्करला होता.

CSK | IPL 2025 | Sakal

IPL 2025 मध्ये कोणता कोच जास्त सॅलरी घेतो? आकडा वाचून व्हाल थक्क

Stephen Fleming Ruturaj Gaikwad | Sakal
येथे क्लिक करा