IPL 2024 आधी कॅप्टनकूलच्या 'विंटेज लूक'ची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलचा 17 वा हंगाम असणार आहे.

IPL Auction 2024

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

CSK vs RCB | MS Dhoni - Virat Kohli | X/IPL

सीएसकेचा सराव

या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघातील खेळाडूंनी चेन्नईमध्ये सरावाला सुरुवातही केली आहे.

Chennai Super Kings | X/ChennaiIPL

धोनीही चेन्नईत

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीदेखील आगामी आयपीएल 2024 च्या सरावासाठी चेन्नईत दाखल झाला आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

विंटेज लूक

दरम्यान, धोनी सरावादरम्यान लांब केसांच्या नव्या लूकमध्ये दिसला आहे. तसेच त्याने स्पोर्ट्स हेअर बँडही घातलेले दिसले. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांना धोनीच्या सुरुवातीचे दिवस आठवले आहेत.

MS Dhoni | X/ChennaiIPL

लांब केसांचा लूक

धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्याचे लांब केस होते.

MS Dhoni | X/ChennaiIPL

जुन्या आठवणी ताज्या

2007 नंतर त्याने त्याचे लांब केस कापले. पण आता पुन्हा एकदा धोनीने केस वाढवले असूत तो जवळपास दोन दशकांनी लांब केसांसह खेळताना दिसणार आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

चर्चा

धोनीच्या या लांब केसातील लूकची सध्या क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

विराट किती IPL सामने खेळणार... कधी करणार आरसीबी जॉईन?

virat kohli | esakal