Pranali Kodre
आयपीएलदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या तरुणींचे हावभाव कॅमेऱ्यात कैद केले जातात.
यामुळे अनेकदा त्या तरुणी अचानक प्रसिद्धही होतात. याचेच उदाहरण काही दिवसांपूर्वीच समोर आले.
गुवाहाटीत झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान एका तरुणीच्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष्य वेधले होते.
धोनी बाद झाल्यानंतर ती वैतागून दात-ओठ रागाने खातानाही दिसली होती. तिचं नाव आर्यप्रिया भूयान असल्याचे समजले.
यानंतर एका रात्रीत तिच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या ८० हजारांनी वाढली. इतकेच नाही, तर तिचे काही फेक अकाऊंटही काढण्यात आले, ज्याबद्दल तिने पोस्ट करत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आता तिच्याच व्हिडिओची दुसरी बाजू समोर आली असून तिच्याकडे मात्र सर्वांचे लक्ष गेले, पण तिच्या समोर असलेल्या एका तरुणाच्या डोळ्यातील धोनी बाद झाल्याचं दु:ख कोणाला दिसलं नसल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.
हा व्हिडिओ देखील सध्या चर्चेचा विषय ठरतोय.