Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने ईडन गार्डन्सवर ८ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सला फक्त ४ धावांनी पराभूत केले.
दरम्यान, या सामन्यात मोठ्या धावा पाहायला मिळाल्या, त्यातही लखनौकडून खेळणाऱ्या निकोलस पूरनच्या फटकेबाजीने मैफल लुटली. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या.
यासोबतच पूरनने आयपीएलमध्ये २००० धावाही पूर्ण केल्या. त्याने ११९९ वा चेंडू खेळताना २००० धावा पूर्ण केल्या.
त्यामुळे चेंडूंच्या तुलनेत केलेल्या या आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जलद २००० धावा ठरल्या.
पूरनने विरेंद्र सेहवागला याबाबतील मागे टाकले. विरेंद्र सेहवागने १२११ चेंडूत आयपीएलमध्ये २००० धावा केल्या होत्या. सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या विक्रमाच्या यादीत सहाव्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल असून त्याने १३०९ चेंडूत आयपीएलमध्ये २००० धावा केल्या होत्या.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या रिषभ पंतने १३०६ चेंडूत २००० धावा केल्या आहेत.
ख्रिस गेल चौथ्या क्रमांकावर असून त्याने १२५१ चेंडूत २००० धावा आयपीएलमध्ये केल्या आहेत.
या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आंद्र रसेल असून त्याने ११२० चेंडूतच आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.