Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जेव्हाही सुरू असते, त्यावेळी अनेक मिस्ट्री गर्ल्सच्या चर्चाही सुरू होतात. स्टेडियममधील तरुणींचे हावभाव जे कॅमेऱ्यात टिपले जातात, ते व्हायरलही होतात.
आयपीएल २०२५ दरम्यान देखील अशा काही तरुणींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात गुवाहाटीत झालेल्या सामन्यादरम्यान एका तरुणीच्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष्य वेधले होते.
या व्हिडिओमध्ये चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीची विकेट गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर काहीसे वैतागलेले भाव होते आणि ती दात-ओठ रागाने खातानाही दिसली होती.
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर ती मुलगी आहे कोण अशा चर्चाही सुरू झाल्या.
अखेर तिचे नाव समोर आले आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या या चाहतीचे नाव आर्यप्रिया भूयान असं असल्याचे समजत आहे.
दरम्यान, तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या इंस्टाग्राम फॉलोवर्समध्ये तुफान वाढ झाल्याचे दिसले. २४ तासाच तिचे फॉलोवर्समध्ये १६ हजारांहून १ लाखांहून अधिकची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय तिच्या नावाने काही फेक अकाऊंटही तयार झालेत, ज्याबद्दल तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.