Pranali Kodre
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दोनवेळा वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली आहे.
२०२३ आणि २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सला ही स्पर्धा जिंकून देण्यात इंग्लंडच्या दिग्गज शारलोट एडवर्ड्सचे मोलाचे योगदान राहिले आहे.
इंग्लंडची माजी कर्णधार एडवर्ड्स पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगपासून मुंबई इंडियन्सची मुख्य प्रशिक्षक होती.
आता तिला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे एडवर्ड्स आता इंग्लंड महिला संघाची प्रशिक्षक म्हणून काम पाहिल.
इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ऍशेसमध्ये पराभूत व्हावं लागल्यानंतर प्रशिक्षक जॉन लेविसने राजीनामा दिला होता. त्यानंतर आता एडवर्ड्स ही जबाबदारी सांभाळेल.
एडवर्ड्सने मुंबई इंडियन्सच्या आधी बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्सचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच इंग्लंडमधील साऊदर्न वायपर्सचीही ती प्रशिक्षक होती.
एडवर्ड्सने २३ कसोटीत १६७६ धावा, १९१ वनडेत ५९९२ धावा आणि ९५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २६०५ धावा केल्या आहेत. तसेच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६० हून अधिक विकेट्स घेतल्या आहे.
इंग्लंड बोर्डाने हिदर नाईट हिलाही कर्णधारपदावरून हटवले असून आता इंग्लंडच्या महिला संघाच्या कर्णधारपदी नव्या खेळाडूची नियुक्ती होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.