Ravindra Jadeja: बरोबर 7 वाजून 38 मिनिटांनी जड्डूचा होणार खास सन्मान!

प्रणाली कोद्रे

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स

आयपीएल 2024 स्पर्धेत सातवा सामना 26 मार्च 2024 रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

चेपॉक

हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

जडेजाचा गौरव

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा सामना चालू झाल्यानंतर 7 वाजून 38 मिनिटांनी चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा चाहत्यांकडून गौरव केला जाणार आहे.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

कारण

रिपोर्ट्सनुसार जडेजाने चेन्नई सुपर किंग्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा गौरव केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

7 वाजून 38 मिनिटे

सामना सुरु झाल्यानंतर आठ मिनिटांनी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी चेन्नईचे चाहते उभे राहुन जडेजासाठी टाळ्यांचा कडकडाट करतील.

CSK Fans | X/ChennaiIPL

8 क्रमांकाची जर्सी

सामना सुरू झाल्यानंतर आठ मिनिटांनी कारण जडेजाचा जर्सी क्रमांक 8 आहे.

Ravindra Jadeja - Shivam Dube | X/ChennaiIPL

2023 आयपीएल फायनलचा हिरो

जडेजाने चेन्नई सुपर किंग्सला 2023 आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हे चेन्नई सुपर किंग्सचे पाचवे विजेतेपद होते. 2023 आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सला पराभूत केले होते.

Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

विराट T20 मध्येही किंग! 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

Virat Kohli | Sakal