Aarti Badade
कंदमूळं त्या वनस्पतींचे भाग आहेत जे जमिनीखाली वाढतात. यामध्ये बटाटा, रताळी, गाजर, मुळा, बीट, अरवी, सुरण आणि इतर प्रकार समाविष्ट आहेत.
बटाटा आपल्या रोजच्या आहारात एक सामान्य कंदमूळ आहे. त्यात कार्बोहायड्रेट, फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 असतात. उकडलेला बटाटा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रताळीतील नैसर्गिक साखरेमुळे मधुमेहींना देखील ते खाण्याची शिफारस केली जाते. यामध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, पोटॅशियम आणि फॉलिक अॅसिड असतात.
गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असतो, जो डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गाजराचा रस आणि सॅलेड खाल्ल्याने आपल्या आरोग्य आणि सौंदर्यात सुधारणा होऊ शकते.
मुळ्याचा नियमित वापर युरीन समस्यांना कमी करतो आणि ताप कमी करण्यासाठी मदत करतो. मुळा खाण्याने पचन प्रक्रिया सुधारते.
बीटामध्ये मुबलक लोह असते. नियमित बीट सेवन केल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो आणि रक्ताची कमतरता दूर होऊ शकते.
अरवी म्हणजे अळूच्या पानांवरील कंद. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजं दडलेली असतात, त्यामुळे पावसाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी चांगले ठरते.
सुरणाला कंदनायक म्हणून ओळखले जाते. याचे सेवन मुळव्याधीच्या समस्यांसाठी फायदेशीर असते. सुरणाची भाजी, वडी आणि भजी अनेक प्रकारे खाऊ शकता.