‘गोड फळ पण कडू परिणाम!’ सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ल्याचने होतात 'हे' ७ दुष्परिणाम

Anushka Tapshalkar

ऍलर्जीचा धोका

काही व्यक्तींना सीताफळ खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज, पुरळ किंवा सूज येऊ शकते. अशा प्रतिक्रिया आढळल्यास सीताफळ खाणे टाळावे.

Allergy

|

sakal

पचनाच्या तक्रारी

सीताफळामध्ये भरपूर फायबर असते. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.

Indigestion Problem

|

sakal

बिया विषारी असतात

सीताफळाच्या बिया खाणे टाळावे. त्यामध्ये विषारी घटक असतात ज्यामुळे पोटदुखी किंवा उलट्या होऊ शकतात.

Toxic Seeds

|

sakal

लोहाचे जास्त प्रमाण

सीताफळामध्ये लोह असते, परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास उलट्या, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

High Iron percentange

|

sakal

रक्तदाब आणि नसांवर परिणाम

सीताफळातील अॅनोनेसिन नावाचे संयुग जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा डोळ्यात पाणी येणे असे त्रास होऊ शकतात.

low blood pressure

|

Sakal

थंड हवेत काळजी घ्या

सीताफळ हे थंड प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्यास सर्दी आणि खोकल्याचा धोका वाढू शकतो.

Take Care in Cold Weather

|

sakal

वजन वाढ आणि डायबिटीसचा धोका

हे फळ गोड आणि कॅलरीने भरलेले असल्यामुळे वारंवार खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे फळ खावे.

Weight Gain

|

sakal

चिया सीड्स खाण्याचा धोका देखील आहे! या लोकांनी आवर्जून टाळा

Chia Seeds Not for Everyone

|

sakal

आणखी वाचा