Shubham Banubakode
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक असून ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुंदर आणि आकर्षक आहे. तिची रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावट ही या मूर्तीची वैशिष्ट्यं आहेत.
दगडूशेठ गणपतीला 'नवसाला पावणारा गणपती' असेही म्हणतात. भाविकांचे नवस पूर्ण करणाऱ्या मंदिरात देश-विदेशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.
ही गणेश मूर्ती १९६८ साली बनवण्यात आली होती. तेव्हा मूर्तीच्या निर्मितीसाठी अत्यंत कुशल कारागिरांचे योगदान लाभले होते.
१९६८ मध्ये ही मूर्ती बनवण्यासाठी अवघे १,१२५ रुपये (एक हजार एकशे पंचवीस रुपये) खर्च आला होता. आजच्या काळात ही रक्कम कमी वाटत असली, तरी त्याकाळी मोठी होती.
दगडूशेठ गणपती मंदिराचा इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक दुखःच्या काळात हे मंदिर स्थापन केले. जे आज पुण्याची ओळख झाली आहे.
गणेशोत्सवात मूर्तीची विशेष सजावट, भक्तांचा उत्साह आणि मिरवणूक यामुळे हे मंदिर पुण्यातील गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू आहे.