Shubham Banubakode
पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख होतो तेव्हा थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव प्रामुख्याने पुढं येतं.
बाजीराव पेशवेंनी त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांच्यासाठी महाल बांधला होता. त्याला 'मस्तानी महाल' म्हणून ओळखं जातं.
पुण्याजवळ असलेल्या कोथरूड भागात इ.स. १७३४ मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांनी मस्तानी यांच्यासाठी हा महाल बांधला होता.
मस्तानी बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांची कन्या. बुंदेलखंडवर मोहम्मद अली शाह बंगशने आक्रमण केलं, तेव्हा छत्रसालांनी थोरल्या बाजीरावांकडे मदत मागितली.
बाजीरावांनी प्रतिसाद देत बंगशचा पराभव केला आणि त्याबदल्यात छत्रसालांनी त्यांची कन्या मस्तानी हिचं लग्न बाजीरावांशी लावून दिलं.
पुण्यात आल्यानंतर मस्तानी यांना राहण्यासाठी कोथरुड भागातील "कोराचा बाग" इथे १७३० ते १७३४ दरम्यान स्वतंत्र महाल उभारण्यात आला होता.
पुढे डॉ. दि. ग. केळकर यांनी या ऐतिहासिक महालाची पुर्नबांधणी केली. आज राजा दिनकर केळकर संग्रहालयात या महालाचं जनत केलं जातं.