Aarti Badade
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा पुण्यात उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथील प्रसिद्ध 'प्रेम मंदिराची' हुबेहूब आणि भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
पुण्यातील कोतवाल चावडी भागात उभारण्यात येणारा हा देखावा तब्बल १०० फूट उंच असून, तो वृंदावनाच्या पांढऱ्या इटालियन संगमरवरी वास्तुकलेसारखा हुबेहूब पांढरा शुभ्र दिसेल.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
वृंदावन येथील मूळ प्रेम मंदिर हे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या दिव्य प्रेमाचे प्रतीक असून, त्याची अथांग भव्यता एखाद्या परीकथेतील अद्भुत महालासारखी भासते.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
या भव्य मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींवर अत्यंत बारीक नक्षीकाम असून, बाप्पाच्या देखाव्यातही खांब आणि घुमटांवर तशीच उत्कृष्ट शिल्पकला पाहायला मिळेल.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
मूळ मंदिरात गोवर्धन पर्वत उचलणे आणि रासलीला यांसारख्या झाक्या आहेत; तशाच प्रकारच्या देखण्या कृष्णलीलांचे थेट दर्शन यंदा गणेश भक्तांना पुण्यात घेता येईल.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
वृंदावनाचे मंदिर रात्रीच्या वेळी लेझर लाईट्समुळे वेगवेगळ्या रंगात बदलताना दिसते, त्याच धर्तीवर दगडूशेठ बाप्पाचा दरबारही डोळे दिपवून टाकणाऱ्या रोषणाईने उजळून निघणार आहे.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
वृंदावनाच्या गाभाऱ्यात राधा-कृष्णाची मनमोहक मूर्ती विराजमान आहे, तर पुण्यात याच देखण्या गर्भगृहाच्या प्रतिकृतीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme
Sakal
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal