काहीतरी झणझणीत खायचंय? मग असा बनवा दही चिकन रस्सा!

Aarti Badade

चिकन प्रेमींसाठी

दही आणि मसाल्यांच्या मिश्रणाने तयार केलेला हा चिकन रस्सा चवीला अतिशय उत्कृष्ट आणि रसरशीत लागतो.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

लागणारे मुख्य साहित्य

यासाठी एक वाटी चिकन, दही, मालवणी मसाला, आले-लसूण पेस्ट, कांदा-टोमॅटो आणि लिंबू रस तयार ठेवा.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

चिकन मॅरीनेट करण्याची पद्धत

चिकनमध्ये लाल तिखट, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, आले-लसूण पेस्ट, दही आणि लिंबू रस घालून चांगले मिक्स करा.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

मसाल्यांची खास पेस्ट

मिक्सरमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून त्याची एकदम मऊ पेस्ट तयार करून घ्या.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

फोडणीची तयारी

कुकरमध्ये थोडे तेल गरम करून त्यात तयार केलेली कांदा-टोमॅटोची पेस्ट टाकून तेलात व्यवस्थित परतून घ्या.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

मसालेदार चिकनचा वापर

पेस्ट परतली की त्यात मसाल्यांनी मॅरीनेट केलेले चिकन घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा एकजीव करून घ्या.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

कुकरमध्ये शिजवण्याची सोपी ट्रिक

मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्या.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

तयार झालेला झणझणीत दही चिकन रस्सा भाकरी, चपाती किंवा वाफाळलेल्या भातासोबत आवडीने खा.

Dahi chicken rassa recipe

|

Sakal

चिकन-मटण खाल्लं की वाढते उष्णता? शरीर थंड ठेवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

येथे क्लिक करा