सकाळ डिजिटल टीम
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा एक अविभाज्य भाग असून, त्याच्या बाललीलांवर आधारित आहे. या उत्सवाची सूरूवात कशी झाली जाणून घ्या.
दहीहंडीचा उत्सव भगवान श्रीकृष्ण लहान असताना केलेल्या खोडकरपणावर आधारित आहे. त्यांना लोणी (माखन), दही आणि दूध खूप आवडत होते.
गोकुळातील माता यशोदा आणि इतर महिला श्रीकृष्णापासून लोणी आणि दही वाचवण्यासाठी ते उंच ठिकाणी माठात टांगून ठेवत असत. यामुळेच श्रीकृष्णाला 'माखनचोर' (लोणी चोरणारा) असे नाव पडले असे म्हंंटले जाते.
लोणी आणि दही मिळवण्यासाठी श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र (गोपाळ) एकत्र येऊन मानवी मनोरा (pyramid) तयार करत असत. या मनोऱ्याच्या मदतीने ते उंच ठिकाणी टांगलेल्या हंडीपर्यंत पोहोचत आणि ती फोडून लोणी खात असे.
श्रीकृष्णाची ही युक्ती केवळ खोडकरपणा नव्हती, तर ती संघभावना आणि एकतेचे प्रतीक होती. एकाला दुसऱ्यावर विश्वास ठेवूनच हा मनोरा यशस्वी होऊ शकला. असे म्हंटले जाते.
दहीहंडीचा उत्सव हा गोकुळाष्टमी म्हणजेच जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व आहे.
काळानुसार या बाललीलांना उत्सवाचे स्वरूप मिळाले. आजच्या काळात, तरुण मुले-मुलींचे गट, ज्यांना 'गोविंदा' म्हटले जाते, दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा तयार करतात.
हा उत्सव केवळ धार्मिक नाही, तर तो तरुणांमध्ये एकता, चिकाटी, साहस आणि टीमवर्कचे महत्त्व रुजवणारा एक सामाजिक कार्यक्रम मानला जोतो.
आधुनिक काळात दहीहंडीच्या उंचीचे आणि मानवी मनोऱ्याच्या सुरक्षिततेचे नियम तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात टाळता येईल.