रोज नीरालंब सर्वांगासन केल्यास कोणते फायदे होतात?

Monika Shinde

नीरालंब सर्वांगासन म्हणजे काय?

ही सर्वांगासनाची प्रगत पायरी आहे. यात कोणताही आधार न घेता संपूर्ण शरीराचा तोल खांद्यांवर ठेवून आसन केले जाते. यामुळे शरीरावर पूर्ण ताण येतो.

What is Neeralamba Sarvangasana

|

Esakal

मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो

या आसनामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे एकाग्रता वाढते, मन शांत राहतं आणि मानसिक थकवा दूर होतो.

Increases blood flow to the brain


|

Esakal

हृदयासाठी फायदेशीर

हृदयावरचा ताण कमी होतो. रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे उच्च रक्तदाब, थकवा किंवा अस्वस्थतेवर नियंत्रण मिळवता येते.Thyroid

Beneficial for the heart


|

Esakal

थायरॉईड

या आसनामुळे मान व कंठ भागात ताण येतो, त्यामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते आणि हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं.

Thyroid


|

Esakal

पचनक्रिया सुधारते

या आसनामुळे पोटावर ताण येतो, त्यामुळे पचनक्रिया सशक्त होते. अन्न नीट पचतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Improves digestion


|

Esakal

शरीराचा तोल आणि संतुलन वाढतं

शरीरावर नियंत्रण आणि संतुलन सुधारण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. त्यामुळे शरीर लवचिक, बळकट आणि संतुलित होतं.

Increases body balance and equilibrium


|

Esakal

मन:शांती आणि तणावमुक्ती

नीरालंब सर्वांगासन केल्याने मन शांत राहतं, तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधरते. ध्यानासारखा परिणाम मिळतो.

Peace of mind and stress relief


|

Esakal

गांधीजींच शिक्षण काय झालं आहे?

येथे क्लिक करा