Monika Shinde
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. त्यांचं बालपण साधं, शिस्तबद्ध आणि शिक्षणावर भर देणारं होतं.
गांधीजींचं प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झालं. शालेय जीवनात ते सामान्य विद्यार्थी होते. खेळात फारसा रस नव्हता, पण वर्तनात ते नेहमीच शिस्तप्रिय होते.
वडिलांच्या बदलीमुळे गांधीजींनी राजकोटमध्ये अल्फ्रेड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी व गणितात चांगले होते, पण हस्ताक्षर आणि भूगोलात थोडे कमजोर होते.
वयाच्या 13 व्या वर्षी गांधीजींचं लग्न झालं. त्यामुळे शिक्षणात थोडा खंड पडला, पण पुढे त्यांनी मेहनतीने हे नुकसान भरून काढलं.
हायस्कूलनंतर गांधीजींनी सामलदास कला महाविद्यालय, भावनगर येथे प्रवेश घेतला. तेव्हा ते संस्थानातील एकमेव पदवी देणारं महाविद्यालय होतं.
1888 मध्ये गांधीजींनी इंग्लंडमधील University College London (UCL) मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी तीन वर्षांत कायद्याची पदवी पूर्ण केली.
गांधीजींचं शिक्षण शिस्तबद्ध, सखोल आणि ध्येयवादी होतं. त्यांचं शिक्षण फक्त शाळांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते जीवनभर शिकत राहिले.