Monika Shinde
भारतीय आहारात तूप हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. जाणून घ्या दररोज एका चमचा तूपाचे आरोग्यावर होणारे फायदे.
तूप हे शरीरातील अग्नी म्हणजेच पाचनशक्ती वाढवते. त्यामुळे अन्न सहज पचते आणि अपचन टाळले जाते.
तूपात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज यामध्ये आराम मिळतो.
तूप हे 'सुपरब्रेन फूड' आहे. ते मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असून लक्ष व स्मरणशक्ती सुधारते.
तूप त्वचेला आतून पोषण देते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि चमकदार बनते.
तूपात असलेले सेंद्रिय फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजार दूर ठेवतात.
दररोज एक चमचा तूप हे तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. फक्त योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत सेवन करा.