Monika Shinde
कढीपत्ता म्हणजे आपला रोजचा आहारात वापरला जाणारा एक महत्त्वाचा मसाला. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
कढीपत्त्यातील घटक पचनक्रियेला सुधारतात. सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता कमी होते.
कढीपत्ता मेटाबॉलिजम वाढवतो. त्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.
कढीपत्ता सर्दी-खोकल्यावर आराम देतो. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे संसर्ग कमी होतो.
कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्वचा तजेलदार आणि निरोगी होते.
कढीपत्ता खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 5-6 कढीपत्त्याची पाने चावणे आणि नंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायचे. तुम्ही कढीपत्त्याचा रस, सूप किंवा चहा या स्वरूपात देखील सेवन करू शकता. रोज असे केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.