Yashwant Kshirsagar
बटाटा ही लोकप्रिय भाजी आहे. याचा वापर अनेक पदार्थात केला जातो. बटाटे स्वस्त असल्याने ते सहज मिळतात. बटाटे उकडून भाजून खाल्ले जाते.
बटाटे आरोग्यदायी आहे कि नाही यावर दीर्घकाळापासून वाद सुरु आहे. पण बटाट्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. याचा ग्लायमेसिक इंडेक्स देखील जास्त असतो. यामुळे तुमची रक्तातील साखर वाढते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बटाटा आरोग्यासाठी खुप लाभदायी आणि पोषक असतो. यात फायबर, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी-6 सारख पोषक गुण असतात.
जर तुम्ही बटाटे उकडून खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यातील कार्बोहायड्र्रेट शरीरासाठी चांगले असतात.
कार्ब्स हे उर्जेचा मुख्य स्त्रोत असतात. बटाट्यातील कार्ब्स प्रोर्टीन आणि फॅट्सच्या तुलनेत लवकर पचतात.
बटाट्याचे आरोग्याला फायदे मिळवायचे असतील तर बटाटे हाय कॅलरी पदार्थासोंबत शिजवू नये.
दररोज एक उकडून बटाटे खाणे आरोग्यासाठी खूप फादेशीर ठरते. यामुळे तुमचा रक्तदाबाची पातळी कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जर तुम्ही वेटलॉस डायटवर असाल तर रोज बटाटे खाऊ शकता. बटाटे खाल्ल्याने तुमचे ओव्हरइटिंग वाचते. तसेच कॅलरीचा इंटेक देखील नियंत्रित राहतो.
(सूचना: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबाबत तुम्ही आरोग्य तज्ज्ञांकडून माहिती घेऊ शकता. )