औरंगजेबाच्या कबरीवर सब्जाचे रोप का लावले जाते?

Yashwant Kshirsagar

कबर

राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. औरंगजेबाच्या कबर ही संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असून या कबरीवर सब्जाचे रोप लावले जाते, यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊया.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

मृत्यू

औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आत्ताच्या औरंगाबादमधील( छत्रपती संभाजीनगर) खुलताबादला आणण्यात आला.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

सैय्यद झैनुद्दीन सिराजी

आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.त्यामुळे त्याचा मृतदेह इथे आणण्यात आला.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

आझमशहा

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलगा आझमशहा याने दक्षिणेकडील इस्लामचा गड असलेल्या खुलताबादेत ही कबर बांधली.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

मृत्युपत्र

आपली कबर कशी असावी हे औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात सविस्तर लिहून ठेवले होते.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

मृत्यूपुर्वीची इच्छा

माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची असे औरंगजेबाने मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

औरंगजेबाची कमाई

औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा. त्यात जी कमाई झाली त्यातूनच त्याची खुलताबादमध्ये कबर बांधण्यात आली.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

सब्जाचे रोप

कबरीवर सब्जाचे रोप देखील लावण्यात यावे आणि वरती कोणतेही छत नसावे अशी इच्छा औरंगजेबाने मृत्यूपत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार त्याच्या कबरीवर सब्जाचे रोप लावले जाते.

Aurangzeb tomb sabja plant | esakal

खोटे बोलताना गरम होतात शरीरातील 'हे' दोन अवयव; तुम्हाला माहित आहे का?

Lie detection body organs | esakal
येथे क्लिक करा