Aarti Badade
अक्रोडमध्ये भरपूर ओमेगा-३ असते, जे हृदय व मेंदू दोन्हीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
अक्रोडमधील अल्फा लिनोलेनिक अॅसिड (ALA) रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठण्यास प्रतिबंध करते आणि हृदयाचे आरोग्य जपते.
दररोज अक्रोड खाल्ल्याने मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.
अक्रोडमधील फायटोन्यूट्रिएंट्स शरीरातील दाह कमी करतात आणि सूज टाळतात.
अक्रोड नियमित सेवन केल्याने शरीरातील चरबीचे चयापचय सुधारते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
अक्रोड हे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात, जे हृदयासाठी महत्त्वाचे आहे.
अक्रोडमध्ये असणारे मॅग्नेशियम व फॉस्फरस हाडांना बळकट आणि निरोगी ठेवतात.
अक्रोड भिजवून खाल्ल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते आणि शरीराला सहज पचते.