Aarti Badade
लोहामुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात, ज्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात. याची कमतरता झाल्यास थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.
पालक ही लोहतत्त्वाने समृद्ध हिरवी पालेभाजी आहे. शिजवून खाल्ल्यास लोह शरीरात सहज शोषले जाते.
राजमा, मसूर, चणे आणि सोयाबीनमध्ये भरपूर लोह, प्रथिने आणि फायबर असते — शाकाहारींसाठी उत्तम पर्याय.
सोयापासून बनवलेला टोफू हा शाकाहारी लोकांसाठी उत्कृष्ट लोहतत्त्वाचा स्रोत आहे.
या छोट्याशा बियांमध्ये मोठं पोषण आहे! स्नॅक्स, सूप किंवा दह्यात टाकून खा.
ग्लूटेन फ्री धान्य – क्विनोआमध्ये लोह आणि प्रथिनांचं उत्तम मिश्रण असतं.
ब्रोकोलीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन C दोन्ही असतात — जे शरीरात लोह शोषण सुधारतात.
७०% पेक्षा जास्त कोको असलेली डार्क चॉकलेट चव आणि आरोग्य दोन्ही देते!
नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी लोहाचा सर्वात प्रभावी स्रोत — शरीरात लवकर कार्य करतो.
सी-फूडमध्ये लोह प्रचंड प्रमाणात असते.
अंडी हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. दररोज खाल्ल्याने उर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
औषधांऐवजी नैसर्गिक अन्नातून लोह मिळवा. पण लक्षणे गंभीर असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या!