Monika Shinde
नियमित अक्रोडचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
अक्रोडमध्ये भरपूर ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर असतात. लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती वाढवणे यासाठी अक्रोड उपयुक्त आहे.
अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अक्रोडमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असल्यामुळे भूक लवकर लागत नाही. त्यामुळे अति खाणं टाळता येतं, आणि वजन नियंत्रणात राहतं.
अक्रोड हे फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
अक्रोडमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई मुळे त्वचा चमकदार राहते आणि केस मजबूत होतात.