संतोष कानडे
पर्यटनाची आवड असणारे लोक पावसाळा आणि हिवाळ्यात अवश्य फिरायला जातात.
विशेषतः हिवाळ्यात पर्यटनाचा अनुभव घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नवनवी ठिकाणं अनुभवण्याची प्रत्येकालाच इच्छा असते.
परंतु अशी काही ठिकाणी आहेत, जिथे फिरायला जाऊ नये, असं सांगितलं जातं. तुम्ही गुगल केलं, तरी ही माहिती सहज मिळेल.
भारतातलं उत्तर सेंटिनेल बेट हे ठिकाण सेंटिनेलीज जमातीमुळे प्रतिबंधित आहे. कारण या लोकांना बाह्य जगाशी संपर्क ठेवायचा नाही.
इथिओपिया इथलं डानाकिल डिप्रेशन हे ठिकाण पृथ्वीवरचं सगळ्यात उष्ण ठिकाण आहे. येथे ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असतं.
येथे ज्वालामुखी, आम्लधर्मी सरोवरे आणि विषारी वायू असतो. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळावं.
मार्सल आयर्लंड्स येथील बिकनी हे ठिकाण अमेरिकेच्या आण्विक चाचण्यांमुळे बाधित आहे. येथे आजही किरणोत्सर्गाची पातळी खूप जास्त आहे.
सीरिया येथे युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि हिंसाचारामुळे हे ठिकाण धोक्याचं आहे.
सोबत यमन येथे सातत्याने दहशतावादी कारवाया, बॉम्बस्फोट, राजकीय अस्थिरता असते. यामुळे इथला प्रवास धोक्याचाच.