दिवसभरात किती वेळा लघवीला जावे?

Aarti Badade

युरिनरी रिटेंशन: एक गंभीर समस्या

धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण लघवी रोखून धरतो, पण वैद्यकीय भाषेत ही सवय अंतर्गत अवयवांचे कायमस्वरूपी नुकसान करू शकते.

times to urinate in a day

|

Sakal

मूत्राशयाची लवचिकता धोक्यात

सतत लघवी रोखल्यामुळे मूत्राशयाचे स्नायू अतिताणले जातात, ज्यामुळे त्याची नैसर्गिक आकुंचन पावण्याची क्षमता संपून 'अंडरॲक्टिव्ह ब्लॅडर'चा त्रास होतो.

times to urinate in a day

|

sakal

किडनी स्टोनचा ५०% वाढता धोका

लघवीतील घातक क्षारांचे स्फटिकीकरण झाल्यामुळे किडनी स्टोन होतो; तसेच प्रवाहाचा दाब उलट फिरल्यास किडनी फेल होण्याचाही धोका असतो.

times to urinate in a day

|

Sakal

पेल्विक स्नायू होतात कमकुवत

लघवी रोखण्यासाठी वापरले जाणारे 'पेल्विक फ्लोअर मसल्स' कमकुवत होतात, ज्यामुळे भविष्यात हसताना किंवा खोकतानाही लघवी गळण्याची समस्या उद्भवते.

times to urinate in a day

|

Sakal

मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI)

लघवी जास्त वेळ साठवून ठेवल्यास बॅक्टेरियांची वेगाने वाढ होते, परिणामी जळजळ होणे, ताप येणे आणि लघवीतून दुर्गंधी येणे असे त्रास होतात.

times to urinate in a day

|

Sakal

दिवसातून किती वेळा लघवीला जावे?

तज्ज्ञ डॉ. एल.एच. घोटेकर यांच्या मते, एका निरोगी व्यक्तीने दिवसातून किमान ६ ते ७ वेळा लघवी करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

times to urinate in a day

|

Sakal

निरोगी राहण्यासाठी 'हे' करा

दिवसभरात २-३ लीटर पाणी प्या, मात्र ते एकाच वेळी न पिता थोड्या थोड्या अंतराने प्या आणि दर ३-४ तासांनी लघवीला जाण्याची सवय लावा.

times to urinate in a day

|

Sakal

स्नायूंच्या मजबुतीसाठी व्यायाम

पेल्विक स्नायू मजबूत करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने 'केगल व्यायाम' (Kegel Exercises) करा आणि सार्वजनिक शौचालय वापरताना स्वच्छतेची काळजी घ्या.

times to urinate in a day

|

Sakal

उच्च रक्तदाबामुळे 'हा' अवयव कायमचा निकामी होऊ शकतो!

High blood pressure kidney failure

|

Sakal

येथे क्लिक करा