Aarti Badade
कामाच्या घाईत किंवा प्रवासात अनेकजण तासनतास लघवी रोखून धरतात, पण ही साधी वाटणारी सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
वारंवार लघवी रोखल्यामुळे मूत्रपिंडावर (Kidney) अतिरिक्त दाब निर्माण होतो, ज्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
जास्त वेळ लघवी साठून राहिल्याने मूत्राशयात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे मूत्रमार्गाचे गंभीर संसर्ग (UTI) होऊ शकतात.
Holding urine side effects lead kidney failure
sakal
लघवीमध्ये युरिक ॲसिड आणि कॅल्शियम ऑक्सालेटसारखे घटक असतात. लघवी रोखल्यामुळे हे घटक जमा होऊन मुतखडा तयार होण्याची शक्यता वाढते.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
सतत लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय ताणले जाते. यामुळे कालांतराने मूत्राशयाचे स्नायू सैल आणि कमकुवत होतात, ज्यामुळे लघवीवर नियंत्रण राहत नाही.
Holding urine side effects lead kidney failure
sakal
लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. ती रोखून ठेवल्याने हे विषारी घटक शरीरातच राहतात, ज्यामुळे इतर आरोग्य समस्या उद्भवतात.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
या सवयीमुळे ओटीपोटातील स्नायूंवर (Pelvic Floor) ताण येतो, ज्यामुळे भविष्यात लघवी करताना वेदना होणे किंवा गळती होणे अशा समस्या जाणवतात.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
जेव्हा नैसर्गिक वेग येईल तेव्हा लघवीला जाणे टाळू नका. भरपूर पाणी प्या आणि मूत्रसंस्थेचे आरोग्य जपण्यासाठी या सवयीमध्ये वेळीच सुधारणा करा.
Holding urine side effects lead kidney failure
Sakal
Colon cancer diet Superfoods for gut health
Sakal