कॅन्सरपासून बचाव हवा? स्वयंपाकघरातील हे 5 सुपरफूड ठरतील आरोग्याचं कवच!

Aarti Badade

मोठ्या आतड्याचा कर्करोग

कोलन कॅन्सर हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेगाने वाढणारा गंभीर आजार आहे, जो प्रामुख्याने अयोग्य आहारामुळे होतो.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

कोलन कॅन्सरची लक्षणे ओळखा

दीर्घकाळ बद्धकोष्ठता, मलमधून रक्त येणे, अचानक वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

संपूर्ण धान्य

ओट्स, ब्राऊन राईस आणि गहू यांसारख्या धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. हे फायबर पचनसंस्था स्वच्छ ठेवून विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

क्रूसिफेरस भाज्या

ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांमध्ये 'सल्फोराफेन' असते, जे शरीरातील डिटॉक्स एन्झाइम्स सक्रिय करून कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखते.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

कडधान्ये आणि शेंगा

मसूर, राजमा आणि हरभरा यांसारखी कडधान्ये आतड्यांमधील पेशींना पोषण देतात आणि ट्यूमरची निर्मिती मंदावतात.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

कॅल्शियमयुक्त दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि पनीरमधील कॅल्शियम आतड्याच्या आतील थराचे संरक्षण करते, तर दह्यातील प्रोबायोटिक्स 'गुड बॅक्टेरिया' वाढवण्यास मदत करतात.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

फॅटी फिश आणि ओमेगा-३

सॅल्मन आणि मॅकरेल माशांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड शरीरातील जुनाट दाह (Inflammation) कमी करून कोलनचे रक्षण करते.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

'या' सवयींना करा टाटा-बाय-बाय

जास्त प्रोसेस्ड फूड, मद्यपान, धूम्रपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कोलन कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

वेळेवर निदान आहे महत्त्वाचे

सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नसल्यामुळे, चाळीशीनंतर नियमितपणे पोटाची तपासणी करून घेणे हाच सर्वोत्तम बचाव आहे.

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

निरोगी आतड्याचा मंत्र

भरपूर पाणी प्या, फायबरयुक्त आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. तुमचे आतडे निरोगी तर तुमचे संपूर्ण आयुष्य सुखी!

Colon cancer diet Superfoods for gut health

|

Sakal

कमी झोप ठरतेय सायलेंट किलर; शरीरावर होतात 5 गंभीर दुष्परिणाम

Better Sleep Tips

|

Sakal

येथे क्लिक करा