'दर-ए-निजात' : पाकिस्तानी मालिका वादात का?

Ashok Jawale

का होतेय चर्चा?

'दर-ए-निजात' या पाकिस्तानी मालिकेतील स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि पितृसत्ताक विचारांच्या चित्रणावरून महिला प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोठी स्टारकास्ट

उमेइरा अहमद लिखित आणि साकिब खान दिग्दर्शित या मालिकेत दुरेफिशान सलीम, शहेरयार मुनव्वर आणि नमीेर नवाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झरयाबची कहाणी

मालिकेतील झरयाबला बालपणीच्या मित्राकडून प्रेमात धोका मिळतो आणि त्यानंतर ती आत्मविश्वास, अपराधीपणा आणि मानसिक संघर्षाचा सामना करते.

दुहेरी निकष

मालिकेत झमील स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण झरयाबच्या भूतकाळाकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो, असा दुहेरी निकष चर्चेत आला आहे.

त्यागाचा प्रश्न

झरयाबचा विवाह अबू बकरशी होण्याच्या कथानकात कौटुंबिक उपकारांची परतफेड करण्यासाठी मुलाच्या आयुष्याचा त्याग अपेक्षित धरण्यावरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

भावनिक दबाव

झरयाबने झमीलला हमनाला घटस्फोट देऊन स्वतःशी लग्न करण्यास सांगण्याच्या प्रसंगावरून भावनिक दबाव आणि दुसऱ्या महिलेच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

अभिनेत्रीचे स्पष्टीकरण

दुरेफिशान सलीमच्या मते, मालिकेचा केंद्रबिंदू महिलांनी स्वतः कसे सावरावे हा नसून पुरुषांच्या चुका सहज माफ होतात आणि महिलांना मात्र अधिक काळ दोष दिला जातो, हा दुहेरी निकष आहे.

प्रेक्षकांची चर्चा

महिलांच्या कपड्यांपासून प्रेमसंबंध, धार्मिकता आणि वैयक्तिक निर्णयांपर्यंतच्या मुद्द्यांच्या माध्यमातून या मालिकेने स्त्री-पुरुष समानतेची चर्चा पुन्हा ऐरणीवर आणली आहे.

रेल्वेच्या डब्यांना लाल, निळा, हिरवा रंग का दिला जातो? कारण जाणून घ्या!

WHY INDIAN RAILWAY COACHES HAVE DIFFERENT COLOURS

|

esakal

येथे क्लिक करा