संतोष कानडे
दारा शिकोह हा मुघल सम्राट औरंगजेबचा मोठा भाऊ आणि शाहजहांचा सर्वात मोठा मुलगा होता.
दाराचा जन्म १६१५ मध्ये झाला तर औरंगजेबचा जन्म १६१८ मध्ये झाला. दोघांमध्ये सत्तासंघर्ष पेटला होता.
दारा शिकोह हा मुघल साम्राज्याचा कायदेशीर वारस होता. मात्र औरंगजेब स्वतःला जास्त लायक समजत असे.
शाहजहां आजारी पडल्यानंतर त्याच्या चारही वारसांमध्ये युद्ध झालं. औरंगजेबने स्वतःच्या भावाची हत्या केली.
दारा शिकोहला औरंगजेबने पकडून धर्मत्यागी घोषित केले होते. त्यामुळे त्याचा त्याने जीव घेतला.
दारा शिकोहने भगवद्गीतेचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होात. 'सिर्र-ए-अकबर'मध्ये त्याने पन्नासहून अधिक उपनिषदांचा अनुवाद केला.
पुढे त्याने 'मज्म-उल-बहरैन' नावाचा ग्रंथ लिहून इस्लाम आणि हिंदू धर्माच्या समानता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सुफीवाद आणि वेदांत यावर दाराने भाष्य केलं. त्यामुळे त्याला औरंगजेबने धर्मत्यागी समजलं आणि हत्या केली.
भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात दारा शिकोहचं मोठं योगदान आहे. परंतु इतिहासाने त्याला न्याय दिला नाही.