संतोष कानडे
शरीराच्या सर्व अंतर्गत क्रिया योग्य रितीने व्हाव्यात,यासाठी व्हिटॅमिन्सचा उपगोय होते. एकून १३ व्हिटॅमिन्स आहेत. त्यात A,C,D,E,K असे स्वतंत्र पाच आणि व्हिटॅमिन B चे आठ प्रकार. त्याला बी कॉम्प्लेक्स म्हणतात. असे एकून तेरा व्हिटॅमिन्स आहेत.
व्हिटॅमिन A (Retinol): डोळ्यांसाठी फायदेशीर, दृष्टी सुधारते. यासह त्वचेच्या आरोग्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्समध्ये आठ प्रकार आहेत. B1 (Thiamine) – ऊर्जा निर्माण, स्नायूंची कार्यक्षमता, B2 (Riboflavin) – त्वचा, केस आणि नखासाठी फायदेशीर, B3 (Niacin) – हृदयाचे आरोग्य, कोलेस्ट्रॉल नियंत्रण, B5 (Pantothenic Acid) – ऊर्जा निर्मिती, हार्मोन संतुलन
व्हिटॅमिन B6 (Pyridoxine) – मेंदूचे कार्य, रक्तातील हेमोग्लोबिन, B7 (Biotin) – केस, त्वचा आणि नखांसाठी उपयुक्त, B9 (Folic Acid / Folate) – गर्भधारणेसाठी महत्वाचे, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते, B12 (Cobalamin) – मेंदू व मज्जासंस्था, रक्तातील लाल पेशी निर्माण करते.
व्हिटॅमिन C (Ascorbic Acid) याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेला उजाळा देते आणि हे जंतुनाशक (Antioxidant) आहे.
व्हिटॅमिन D मुळे हाडे आणि दात मजबूत होतात, कॅल्शियम शोषण प्रक्रिया सुधारते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.
व्हिटॅमिन E च्या सेवनाने त्वचा आणि केसांना फायदा होतो. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते आणि फ्री रेडिकल्सपासून संरक्षण (Antioxidant) देते.
सर्वात शेवटचा प्रकार व्हिटॅमिन K आहे. हे व्हिटॅमिन रक्तासाठी आवश्यक मानलं जातं. शिवाय हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी टिकवण्यासाठी आवश्यक आहे. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.