संतोष कानडे
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण गीतेचा अनुवाद करणारा एक मुघलदेखील होता
खरंतर हा व्यक्ती मुघल साम्राज्याचा कायदेशीर वारस होता, मात्र कपटाने त्याला मारण्यात आलं
हा कपटी व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून चक्क औरंगजेब होता. त्याने आपल्या भावालाच संपवलं
या मुघलाचं नाव होतं दारा शिकोह. तो औरंगजेबाचा मोठा भाऊ आणि शहाजहांचा मोठा मुलगा होता.
शाहजहां आजारी पडल्यानंतर त्याच्या चारही वारसांमध्ये युद्ध झालं. औरंगजेबने सत्तेसाठी भावाची हत्या केली.
दारा शिकोहने भगवद्गीतेचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होता. 'सिर्र-ए-अकबर'मध्ये त्याने पन्नासहून अधिक उपनिषदांचा अनुवाद केला.
दारा शिकोहला औरंगजेबने पकडून धर्मद्रोही घोषित केले होते. त्यातून हत्या घडवून आणली
दाराने भारतीय संस्कृतीवर विपुल अभ्यास केला होता. हिंदू धर्मावरही त्याने अभ्यास केलेला.