Saisimran Ghashi
डोळ्याखालील काळे घेरे चेहऱ्याचा पूर्ण लुक घालवतात
हे डार्क सर्कल दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे.
डोळ्याखाली काळे घेरे घालवण्यासाठी कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई चा वापर फायदेशीर आहे
एक चमचा कोरफड जेल घ्या आणि त्यात एक व्हिटॅमिन ई कॅप्सुलचे तेल मिक्स करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून कोरडा पुसा. तयार मिश्रण बोटांच्या मदतीने डोळ्याखाली सौम्यपणे लावा.
हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करून जेल त्वचेत शोषून घ्या. हे मिश्रण रात्रभर ठेवून सकाळी साध्या पाण्याने धुवा.
दररोज वापर केल्यास काळे घेरे कमी होतात आणि त्वचा उजळते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.