Saisimran Ghashi
नॅच्युरली गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी लिपस्टिकचा वापर टाळता येतो आणि काही घरगुती उपाय करून नैसर्गिक सौंदर्य टिकवता येते.
ओठांवर थोडं लिंबाचा रस आणि मध लावून हलक्या हाताने मसाज करा. हे ओठांचं डार्कनेस कमी करतं आणि नैसर्गिक गुलाबी रंग देतं.
थोडी साखर आणि मध एकत्र करून आठवड्यातून २ वेळा हलकं स्क्रब करा. त्यामुळे मृत पेशी दूर होतात आणि ओठ सौम्य आणि गुलाबी दिसतात.
बीटरूटचा रस ओठांवर लावल्यास नैसर्गिक गुलाबी रंग येतो. यामध्ये नैसर्गिक रंगद्रव्यं असतात.
झोपण्यापूर्वी ओठांवर देशी तूप लावल्याने ते भरलेले, मऊ आणि चमकदार होतात.
उन्हात जाताना ओठांवर लिप बाम वापरा ज्यात SPF असतो. सूर्यप्रकाशामुळे ओठ काळे होऊ शकतात.
ताजे अॅलोवेरा जेल ओठांवर लावल्याने ते हायड्रेट राहतात आणि मऊ होतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.