Saisimran Ghashi
तुळशीला हिंदू धर्मात खूप पवित्र आणि शुभ मानले जाते
मान्यतेनुसार, यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीच्या झाडाविषयी अनेक नियम आहेत
धर्म शास्त्रानुसार, रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी तुळस तोडू नये,असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असल्यास तुळस तोडणे टाळावे
तसेच महिन्याच्या कोणत्याही एकादशी, द्वादशी, अमावस्या आणि पौर्णिमेलाही तुळस तोडू नये
सूर्यास्त झाल्यानंतरही तुळस तोडू नये किंवा त्याला हात लावू नये कारण याने भगवान विष्णु नाराज होऊ शकतात
ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही