Aarti Badade
पर्यटनाचा एक वेगळा प्रकार – जिथे लोक मृत्यू, आपत्ती, युद्ध आणि भयावह घटनांच्या ठिकाणी भेट देतात. यालाच डार्क टूरिझम म्हणतात.
फोटोसाठी नव्हे, तर ‘थ्रिल’, इतिहास आणि वास्तव अनुभवण्यासाठी ही पिढी अशा जागा शोधते.
इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या भयावह ठिकाणांच्या पोस्टमुळे डार्क टूरिझमला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
जिथे पुस्तकात नोंद नाही अशा घटनांची माहिती घेण्यासाठी डार्क टूरिझम उपयुक्त ठरतो.
1919 मधील ब्रिटिश गोळीबाराचा इतिहास आजही या जागी जिवंत आहे – अनेकांचे बलिदान आणि क्रौर्याची साक्ष.
‘काळा पाणी’ – स्वातंत्र्यसैनिकांवरील अत्याचार आणि त्यांचा संघर्ष येथे अनुभवता येतो.
एका रात्रीत संपूर्ण गाव ओस पडलं. आजही या गावाला शापित मानलं जातं!
‘स्केलेटन लेक’ – हजारो वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे, अजूनही एक रहस्य!
नारायणराव पेशव्यांच्या हत्येच्या कहाण्या आणि दंतकथेत ऐकू येणारा काका मला वाचवाचा आक्रोश !
रोमांच, इतिहास आणि सत्य शोधणाऱ्या प्रवाशांसाठी डार्क टूरिझम ही नवी दिशा ठरत आहे.