भारताचा हिरा ठरतोय इराणची आर्थिक ताकद! सेंट्रल बँकेच्या तिजोरीत युद्धाचा बॅकअप प्लॅन

संतोष कानडे

दरिया-ए-नूर

'दरिया-ए-नूर' या नावाचा हिरा तेहरान येथील सेंट्रल बँक ऑफ इराणच्या तिजोरीमध्ये नॅशनल ज्वेल्स ट्रेझरीमद्ये ठेवलेला आहे.

वजन

'दरिया-ए-नूर' या हिऱ्याचं वजन १८२ कॅरेट एवढं आहे. जगातल्या सर्वात मोठ्या पिंक डायमंड्सपैकी तो एक आहे.

मुघल

हा हिरा भारतातील गोळकोंडा खाणीतून निघालेला होता. मुघल साम्राज्याच्या खजिन्याचा अनमोल भाग ठरलेला हा हिरा आज इराणकडे आहे.

नादिर शाह

१७३९मध्ये इराणचा शासक नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केलं. त्यात त्याने मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा आणि 'दरिया-ए-नूर' हा हिरा लुटून नेला.

रेझा शाह पहलवी

१९३७ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते रेझा शाह पहलवी यांनी हा हिरा सरकारी खजिना म्हणून घोषित केला.

आर्थिक शक्ती

आज हा हिरा केवळ एक ऐतिहासिक वस्तू नाही तर इराणच्या चलन व्यवस्थेचा आणि आर्थिक शक्तीचा एक मोठा आधार आहे.

समुद्र

'दरिया-ए-नूर' म्हणजे प्रकाशाचा समुद्र. या हिऱ्याला कोहिनूरचा भाऊदेखील म्हटलं जातं. मात्र आज कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या ताब्यात आहे.

शाही खजिना

२० ते ५० अब्ज डॉलर्सच्या शाही खजिन्यामध्ये हा मुख्य हिरा आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा हिरा ठरतोय.

युद्ध

इराणचा शाही खजिना म्हणजे युद्धाचा बॅकअप प्लॅन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताचा हा हिरा आज इराणची ताकद बनून राहिला आहे.

हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्य झालं बळकट

Mughal Harem

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>