अंकिता खाणे (Ankita Khane)
शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा व्हावा, यासाठी आहारतज्ज्ञ डाएटमध्ये खजुराचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
कारण यामध्ये पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.
जर आपण आहारातून साखर वर्ज्य करण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी खजुराचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला कोणतेही अपाय होणार नाहीत शिवाय ऊर्जेचा पुरवठा देखील होईल.
तसंच खजुरामध्ये लोह, मॅग्नेशिअम यासारख्या व्हिटॅमिन व खनिजांचाही साठा मुबलक प्रमाणात आहे. महत्त्वाचे म्हणजे खजूर हे ग्लुटेन फ्री, चवीला स्वादिष्ट व पौष्टिक खाद्य आहे. आपण खजुराचा समावेश नाश्ता व स्मूदीमध्येही करू शकता.
पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक
खजुराच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये फायबरची मात्रा अधिक असते. खजुरातील पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे मेंदूमधील सूज व ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त खजुरामध्ये पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषकघटक देखील आहेत, जे मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.
खजुरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.
यातील खनिजांमुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडते आणि हृदयविकारांचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. कारण यामध्ये कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
खजूरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यासारखे खनिजे असतात, हे घटक शरीराची हाडे मजबूत ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
खजूरमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते व फायबरचे प्रमाण जास्त असते, हे घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
यामुळे शरीराला वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. तसंच आहारातून साखर वर्ज्य करायची असेल तर यास खजूर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.