बाळकृष्ण मधाळे
दवणा म्हटलं की अनेकांच्या मनात जोतिबाचा डोंगर येथे देवाला वाहण्यासाठी नेले जाणारे लहान, वाळलेले अखंड झाड आठवते. दवणा सुगंधी तर आहेच, पण त्याचे धार्मिक महत्त्वही तितकेच मोठे आहे.
Davana Plant Benefits
esakal
दवण्याला संस्कृतमध्ये अतिशय सात्विक व धार्मिक नावे दिली आहेत, जसे की तपस्वीपुत्र, पवित्रक, पुंडरीक, ब्रह्मजटी आणि वामन.
Davana Plant Benefits
esakal
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दवणा सर्वत्र आढळतो. मात्र, त्याचा वास थोडासा कडवट असल्यामुळे अनेकदा तो दवणा आहे हे लगेच लक्षात येत नाही.
Davana Plant Benefits
esakal
ही वनस्पती साधारणपणे ‘काँग्रेस’ या तणासारखी (गाजरगवत) दिसते, पण थोड्या निरीक्षणाने दोघांमध्ये फरक ओळखता येतो.
Davana Plant Benefits
esakal
दवण्यात कापरासारखे उडनशील तेल असते, त्यामुळे वाळवलेला दवणा अतिशय सुगंधी असतो.
Davana Plant Benefits
esakal
दवणा हा एक प्रभावी औषधी वनस्पती म्हणूनही ओळखला जातो. त्याचे काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत :
Davana Plant Benefits
esakal
दवण्याचा गरम पाण्यात लेप करून लावल्यास वेदना कमी होतात.
Davana Plant Benefits
esakal
दवणा गरम पाण्यात मिसळून घेतल्यास पोट साफ होते व वाढलेले पित्त कमी होते.
Davana Plant Benefits
esakal
दवणा जाळून तयार केलेला क्षार वापरला जातो.
Davana Plant Benefits
esakal
दवणा गरम पाण्यासोबत घेतल्यास श्वास घ्यायला होणारा त्रास कमी होतो.
Davana Plant Benefits
esakal
दवणा पाण्यात उकळून दिल्यास घाम येऊन ताप लवकर उतरतो.
Davana Plant Benefits
esakal
रात्री दवण्याचा काढा घेतल्यास झोप येण्यास मदत होते.
Davana Plant Benefits
esakal
अशा प्रकारे, दवणा ही केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे.
प्रिय वाचकांनो, ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा लेख उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कोणत्याही आरोग्यसंबंधी उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Davana Plant Benefits
esakal
Red Sandalwood Benefits
esakal