Red Sandalwood Doll : जुनं ते सोनं! सूज आणि हाडांच्या दुखण्यावर वरदान ठरतेय 'रक्तचंदनाची बाहुली'; आजीच्या बटव्यातील या जादूई बाहुलीचा चमत्कार पहा...

बाळकृष्ण मधाळे

आजीच्या बटव्यातील प्रभावी औषध

पाच-सहा दशकांपूर्वी, किंबहुना त्याही आधीच्या काळात अत्याधुनिक औषधोपचारांची सुविधा सहज उपलब्ध नव्हती. त्या वेळी घरातील आजीच्या बटव्यातील आयुर्वेदीय उपायांवरच अनेक आजारांवर उपचार केले जात. आयुर्वेदाला विशेष महत्त्व होते आणि घरगुती औषधांवर लोकांचा पूर्ण विश्वास होता.

Red Sandalwood Benefits

|

esakal

आयुर्वेदीय उपचारात रक्तचंदनाचे महत्त्व

त्यापैकीच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे रक्तचंदनाची बाहुली. पाय मुरगळणे, मुकामार लागणे किंवा अंगावर सूज येणे अशा प्रसंगी आजीच्या बटव्यातून ही बाहुली लगेच बाहेर काढली जात असे.

Red Sandalwood Benefits

|

esakal

रक्तचंदनाचा लेप

रक्तचंदन उगाळून त्याचा लेप दुखऱ्या किंवा सुजलेल्या भागावर लावला जाई. लेप सुकल्यानंतर त्या जागी गरम पाण्याने किंवा मिठाच्या शेकाने शेक दिला की वेदना कमी होत आणि रुग्णाला आराम मिळत असे. आजही काही पारंपरिक घरांमध्ये ही रक्तचंदनाची बाहुली पाहायला मिळते.

Red Sandalwood Benefits

|

esakal

भारतात आढळणारी आयुर्वेदीय औषधी वनस्पती

रक्तचंदन ही भारतात आढळणारी एक महत्त्वाची आयुर्वेदीय औषधी वनस्पती आहे. शास्त्रीय भाषेत तिला Pterocarpus Santalinus असे म्हणतात. अनेक ठिकाणी लोक रक्तचंदन उगाळून कपाळावर टिळा देखील लावतात.

Red Sandalwood Benefits

|

esakal

सूज आणि वेदनांवर रामबाण उपाय

रक्तचंदनाच्या लाकडापासून ही बाहुली तयार केली जाते. हाडे किंवा सांधे दुखत असतील, शरीरावर मुकामार बसला असेल किंवा सूज आली असेल तर रक्तचंदनाचा जाडसर लेप लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. विशेषतः मुकामार लागल्यामुळे त्वचा लाल होऊन ठणका लागत असल्यास हा उपाय उपयुक्त मानला जातो.

Red Sandalwood Benefits

|

esakal

गरम मिठाचा शेक

सूज आलेल्या भागावर रक्तचंदन उगाळून त्याचा जाड लेप लावतात. लेप पूर्णपणे वाळल्यानंतर रुग्णाला सहन होईल इतक्या गरम मिठाचा शेक दिला जातो. या प्रक्रियेमुळे सूज कमी होऊन वेदना शांत होण्यास मदत मिळते.

Red Sandalwood Benefits

|

esakal

रक्तचंदन आणि सफेद चंदनामध्ये फरक

रक्तचंदन आणि सफेद चंदन यामध्ये मात्र मोठा फरक आहे. रक्तचंदनाच्या झाडामध्ये लाल रंगाचा द्रव असतो, त्यामुळे त्याच्या लाकडालाही लाल रंग असतो आणि म्हणूनच त्याला "रक्तचंदन" असे नाव पडले आहे.

Red Sandalwood Benefits

|

esakal

रक्तचंदनाला सुगंध नसतो!

विशेष म्हणजे, साधारण चंदनाप्रमाणे रक्तचंदनाला सुगंध नसतो. सफेद चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध असले तरी रक्तचंदन हे मुख्यतः औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते.

Red Sandalwood Benefits

|

esakal

परंपरेने चालत आलेला घरगुती उपाय

परंपरेने चालत आलेला हा घरगुती उपाय आजही काही ठिकाणी जपला जात असून, आयुर्वेदीय ज्ञानाची ही एक मौल्यवान परंपरा मानली जाते.

Red Sandalwood Benefits

|

esakal

डिस्क्लेमर :

प्रिय वाचकांनो, ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा लेख उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कोणत्याही आरोग्यसंबंधी उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Red Sandalwood Benefits

|

esakal

Babool Pods Benefits : महागड्या औषधांना करा टाटा-बायबाय! बाभळीच्या शेंगांच्या चूर्णामध्ये दडलंय निरोगी आयुष्याचं रहस्य; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Babool Pods Benefits

|

esakal

येथे क्लिक करा...