समुद्राच्या तळाशी लपलेला सर्वात घातक शिकारी! जो चक्क बाण सोडून शिकार करतो, त्याचे हे भयंकर रहस्य माहितीये का?

Vinayan

मृत्यूचा बाण सोडणारा शिकारी!

समुद्राच्या तळाशी लपलेला हा जीव दिसायला अतिशय सुंदर असला, तरी तो एका झटक्यात बाण मारून शिकार करतो. याचे हे गुपित थक्क करणारे आहे.

Cone Snail

|

Sakal

सुंदर पण धोकादायक कवच

याच्या पाठीवरील शंखाचे डिझाईन इतके आकर्षक असते की, लोक याच्या सौंदर्याला भुलतात; पण या सौंदर्यामागे मोठा धोका दडलेला असतो.

Cone Snail

|

Sakal

तोंडाबाहेर येणारा बाण

कोन स्नेल आपल्या भक्ष्याचा वेध घेण्यासाठी तोंडाबाहेर एक लांब, सुईसारखी टोकदार आणि पोकळ रचना बाहेर फेकतो, ज्याला 'हार्पून' म्हटले जाते.

Cone Snail

|

Sakal

एकाच बाणात शिकार गारद

हा विषाचा बाण इतक्या वेगाने सुटतो की, तो थेट भक्ष्याच्या शरीरात विष सोडतो आणि सेकंदात त्याला बेशुद्ध किंवा मृत करतो.

Cone Snail

|

Sakal

मानवासाठी ठरतो प्राणघातक

हा बाण मानवाची त्वचा किंवा कपडे सहज भेदून शरीरात विष पोहोचवू शकतो. याच्या विषावर अजूनही कोणतीही खात्रीशीर लस नाही.

Cone Snail

|

Sakal

औषध निर्मितीत संशोधनाचा वापर

जरी याचे विष प्राणघातक असले, तरी वैज्ञानिक याच्या विषाचा वापर मानवातील तीव्र वेदना कमी करणाऱ्या आधुनिक औषधांच्या संशोधनासाठी करत आहेत.

Cone Snail

|

Sakal

उष्ण समुद्रातील रहिवासी

हा जीव प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय समुद्रात, प्रवाळांच्या खड्ड्यांमध्ये आणि समुद्राच्या वाळूत लपून राहणे पसंत करतो.

Cone Snail

|

Sakal

समुद्रकिनारी काळजी घ्या!

त्यामुळे समुद्रकिनारी फिरताना अनोळखी किंवा सुंदर शंख उघड्या हाताने उचलणे टाळा, कारण हा बाण कधीही धोका ठरू शकतो!

Cone Snail

|

Sakal

आंध्र प्रदेशला धडकणाऱ्या 'अर्णब' चक्रीवादळाचे नाव कोणी आणि कसे ठेवले? जाणून घ्या रंजक इतिहास

Cyclone Arnab

|

Sakal

हे जाणून घ्या !