Anuradha Vipat
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखलं जातं.
प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्रार्थनाने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रार्थनाच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
प्रार्थनाने भावुक पोस्ट लिहित भावाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
“लव्ह यू पिंटू… तुझी कायम आठवण येत राहील. तू असा अचानक निघून गेलास. पण, भाऊ असे कधीही वेगळे होत नाहीत. आठवणी कायम मनात जिवंत राहतात. Rest in peace … आपण पुढच्या जन्मात एकमेकांना भेटू.” अशी पोस्ट शेअर करत प्रार्थनाने दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रार्थना सोशल मिडीयावर सक्रिय असते