Vinod Dengale
पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर गुन्हेगारांना न्यायालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षा नेमक्या काय आहेत. या दोन्ही शिक्षांमध्ये नेमका फरक काय?
फाशीची किंवा मृत्युदंडाची शिक्षा ही भारतातील सर्वात कठोर शिक्षा मानली जाते. यात गुन्हेगाराला कायदेशीररीत्या मरेपर्यंत गळ्यात फास देऊन त्याचे जीवन संपविले जाते.
अत्यंत गंभीर गुन्हे, दहशतवाद, क्रूर हत्याकांड किंवा "रेअरेस्ट ऑफ रेअर" (म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर) प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते.
जन्मठेपीची शिक्षा म्हणजे गुन्हेगाराच्या उर्वरित संपूर्ण आयुष्याचा काळ किंवा कमीत कमी 20 वर्ष तुरुंगात घालवणे. शक्यतो ही शिक्षा आयुष्यभरासाठी असते.
काही प्रकरणांमध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल दयेचा अधिकार वापरुन शिक्षा 14 वर्षांपर्यंत कमी करू शकता.
तर होय, काही अटी आणि सरकारी निर्णयांनुसार शिक्षेत सवलत मिळू शकते. पण न्यायालयाने विशेष निर्देश दिल्यास गुन्हेगाराला संपूर्ण आयुष्य तुरुंगातच राहावे लागू शकते.
फाशीच्या शिक्षेत गुन्हेगारात सुधारणेची कोणतीही शक्यता नसते तर जन्मठेपेत गुन्हेगाराला सुधारण्याची शक्यता असते.
फाशीची शिक्षा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पुनर्विचार याचिका आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज अशा अनेक टप्प्यांतून प्रक्रिया पार पडते.
Strange War in History
ESakal