सूरज यादव
उन्हाळा सुरू झाला की तापमानाचा पारा वाढल्याचं आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा या बाबी सामान्य आहेत. सध्या भारतात अनेक ठिकाणी ४० अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.
Death Valley
Esakal
जगात सर्वाधिक तापमान कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीत नोंद झालं होतं. १९१३ मध्ये या ठिकाणी ५६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
Death Valley
Esakal
२०१३मध्येही डेथ व्हॅलीमध्ये ५४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं. या ठिकाणी सकाळी दहा नंतर बाहेर पडू नये असं आवाहन लोकांना केलं जातं.
Death Valley
Esakal
कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटात डेथ व्हॅली आहे. लांब पण अरुंद असलेल्या या व्हॅलीच्या बाजूला उंच पर्वतही आहेत. रात्रीच्या वेळी इथलं तापमान २८ ते ३७ अंश सेल्सिअस असतं.
Death Valley
Esakal
समुद्र सपाटीपासून डेथ व्हॅली १९० फूट खाली आहे. या भागात मानवाला जास्त काळ टिकून राहणं कठीण आहे. सामान्य तापमानही ५० अंश सेल्सिअसच्या वर असतं.
Death Valley
Esakal
डेथ व्हॅलीत पाऊस खूप कमी पडतो तर थंडी जवळपास नसतेच. प्रशांत महासागरातून हवा इथं पोहोचेपर्यंत त्यातली आर्द्रता कमी झालेली असते.
Death Valley
Esakal
डेथ व्हॅलीतील जमीनीचं तापमान १९७२ मध्ये ८९ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं होतं.समुद्रीसपाटीपासून खाली असल्यानं इथं तापमान आणखी वाढतं.
Death Valley
Esakal
लिबियातील अल अजीजिया इथं गिनिज भुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार ५८ अंश सेल्सिअस तापमानाचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा वर्ल्ड मीटरोलॉजिकल ऑर्गनायझेशनने चुकीचा ठरवला होता.
Death Valley
Esakal
Stomach heat relief remedies
Sakal