Mansi Khambe
मुंबई आणि पुणे येथील तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस दरम्यानची प्रसिद्ध रेल्वे सेवा असलेल्या डेक्कन क्वीनने आज १ जून २०२५ रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
मध्य रेल्वेची ही गौरवशाली ट्रेन १९३० मध्ये जेव्हा सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिचे नाव 'डेक्कन क्वीन' असे होते.
ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (GIPR) द्वारे सुरू करण्यात आलेल्या या ट्रेनने काळानुसार अनेक ऐतिहासिक बदल पाहिले आहेत. सुरुवातीला त्यात ७ डबे होते, जे विशिष्ट रंगांमध्ये रंगवले होते.
२०२१ मध्ये, प्रवाशांना पश्चिम घाटाच्या दृश्यांचा आनंद घेता यावा यासाठी पहिला विस्टाडोम कोच जोडण्यात आला.
जून २०२२ मध्ये 'प्रोजेक्ट उत्कृष्ठ' अंतर्गत पारंपारिक कोच अत्याधुनिक एलएचबी कोचने बदलण्यात आले. आता ही ट्रेन १६ कोचसह धावत आहे.
या ट्रेनने भारतीय रेल्वेमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच रोलर बेअरिंग कोच वापरण्यात आले. तसेच प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या चेअर कार सुरू करण्यात आल्या.
डेक्कन क्वीन ही भारतातील एकमेव नियमितपणे धावणारी ट्रेन आहे ज्यामध्ये डायनिंग कार आहे. यामध्ये प्रवाशांना टेबल सेवा दिली जाते. ही डायनिंग कार प्रवाशांचा अनुभव खास बनवते.
'डेक्कन क्वीन' ही केवळ एक ट्रेन नाही तर मुंबई आणि पुणे यांच्यातील सांस्कृतिक आणि भावनिक संबंधाचे प्रतीक बनली आहे.
गेल्या ९ दशकांमध्ये या ट्रेनने लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा एक भाग बनून त्यांच्या आठवणींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काळानुसार ट्रेन बदलली, परंतु तिचा उद्देश आणि ओळख तीच आहे.
९६ वर्षे पूर्ण करणारी डेक्कन क्वीन भारताच्या रेल्वे इतिहासाचा हा एक गौरवशाली वारसा आहे, जो भविष्यातही आपल्या सन्मानाने आणि सेवांनी प्रवाशांच्या हृदयावर राज्य करत राहील.
भारतातील एक गाव जिथे फक्त महिलाच हॉटेल चालवतात, कारण काय?