Mansi Khambe
उत्तराखंडमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या वेगळ्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र या ठिकाणी एक असे गाव आहे जिथे सर्व काही चालवण्याची जबाबदारी फक्त महिलांवर आहे.
महिलांचे गाव (ज्याला बुआरी गाव असेही म्हणतात). उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशातील एक लपलेले रत्न आहे, जिथे निसर्गाचे सौंदर्य महिला सक्षमीकरणाच्या भावनेशी जोडलेले आहे.
प्रचंड पर्वतांनी वेढलेले, हिरवीगार कुरणे असलेले हे गाव शहराच्या गर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. जर तुम्ही अशा अनोख्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती नक्की वाचा.
उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात असलेले बुआरी गाव महिलांसाठी ओळखले जाते. येथील महिला स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करतात.
प्रत्येक कॉटेज निसर्गाभोवती विचारपूर्वक डिझाइन केले आहे. लाकडी फर्निचर डबल बेड उपलब्ध आहे. तसेच येणाऱ्या पाहुण्यांसाठी पार्किंगची जागा, आणि ग्रंथालयासारख्या सुविधा देखील आहेत.
येथे येणाऱ्या पाहुण्यांना स्थानिक घटकांपासून बनवलेले जेवण दिले जाते. ज्यामध्ये गढवाली पदार्थांची चव वेगळीच असते. एवढेच नाही तर शेतातून ताज्या फळांपासून ते बागेतील ताज्या भाज्यांपर्यंत सर्व काहीचा आस्वाद घेता येतो.
घोडेस्वारी, ट्रेकिंग अशा मनोरंजनाच्या अनेक पर्यायांचा आनंद घेऊ शकता येईल. तसेच येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी गवत कापण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते जी पर्यटकांना आकर्षित करते.
या गावात जाण्याचा मार्ग
देहरादूनपासून १२१ किमी अंतरावर एक सुंदर ड्राईव्ह केल्यानंतर १५०/४०० मीटर अंतर चालावे लागते. किंवा येथून तुम्ही चिनालिसौरला टॅक्सीने जाऊ शकता आणि नंतर माथोलीला दुसरी टॅक्सी घेऊ शकता.
देहरादून ते उत्तरकाशीपर्यंत सुवा खोली, मोरयाना टॉप आणि चिनालिसौर मार्गे बस सेवा उपलब्ध आहेत. तसेच ऋषिकेशहून चंबा, चिनालिसौर आणि ब्रेथीसाठी बस सेवा देखील उपलब्ध आहेत. त्यानंतर ब्राथी बस स्टँडवरून माथोलीला जाण्यासाठी टॅक्सी घेता येते.
एक विधवा मुघल साम्राज्याची सर्वात शक्तिशाली महिला कशी बनली? वाचा 'हा' इतिहास