kimaya narayan
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री. पण तिची सुरुवात मॉडेलिंग आणि जाहिरातपासून झाली.
सध्या दीपिकाची एक जुनी जाहिरात चर्चेत आहे. या जाहिरातीत मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रीने दीपिकाच्या आईची भूमिका साकारली आहे.
ही तामिळनाडूतील एका साडी ब्रँडची जाहिरात होती. निहा असं या ब्रॅण्डचं नाव होतं. त्यामुळे ही जाहिरात व्हायरल होतेय.
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या जाहिरातीत काम केलं होतं. त्यांनी दीपिकाच्या आईची भूमिका साकारली होती.
ही जाहिरात आजही चर्चेत असून प्रेक्षक सुकन्या आणि दीपिकाच्या बॉण्डचं कमेंट्समध्ये कौतुक करतात.
आई-मुलीच्या नात्याची गोष्ट या जाहिरातीमधून उलगडण्यात आली होती.
सध्या सुकन्या कोण होतीस तू काय झालीस तू ? या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करत आहेत.
त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा गाजला होता.