kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अलका यांनी मराठी इंडस्ट्रीचं एक पर्व गाजवलं आहे.
ज्या सिनेमाने त्यांना सुपरस्टार बनवलं तो सिनेमा म्हणजे माहेरची साडी. हा सिनेमा आजही मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.
हा सिनेमा नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरला होता. अक्षरशः खोऱ्याने पैसा या सिनेमाने कमावला होता.
लक्ष्मी नावाच्या मुलीची व्यथा या सिनेमात मांडण्यात आली होती. आधी वडिलांचा तिरस्कार, नंतर सासूचा छळ यातून तिने सहन केलेल्या हालअपेष्टा या सिनेमात दाखवण्यात आल्या होत्या.
अलका यांच्या बरोबर रमेश भाटकर, अजिंक्य देव, किशोरी शहाणे, विक्रम गोखले यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. विजय कोंडके यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.
पण तुम्हाला माहितीये का ? हा सिनेमा ओरिजिनल नसून हा राजस्थानी सिनेमाचा रिमेक आहे. बाई चाली सासरीये असं या सिनेमाचं नाव आहे.
उपासना सिंह यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्या काळी खूप गाजला होता.
माहेरची साडी या सिनेमाने 12 करोड रुपयांची कमाई केली होती तर बाई चाली सासरीये सिनेमाची कमाई उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.