Apurva Kulkarni
संदीप रेड्डी वांगा यांचा स्पिरिट चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या चित्रपटातून दीपिकाला काढण्यात आलय.
दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरी हिला संधी मिळाली आहे. प्रभाससोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.
परंतु दीपिकाला चित्रपटातून काढण्याचं कारण नक्की काय होतं? खरंच दीपिकाला 20 कोटी रुपये कमी होते का?
रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण चित्रपट न करण्याचं मुख्य कारण संदीप रेड्डीसोबत वाद झालेला.
दीपिकाने 20 कोटीपेक्षा जास्त रुपये आणि मुलगी दुआला सांभाळण्यासाठी शुटिंगची वेळ कमी करण्याची मागणी केली होती.
परंतु हे संदीप रेड्डी वांगा यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तिला चित्रपटातून काढून टाकलं.
दरम्यान त्यांनी दीपिकावर स्क्रीप्ट लीक केल्याचा आरोपही लगावला. तसंच ज्युनिअर आर्टिस्टसोबत चांगली वागणून नसल्याचंही म्हणाले.