kimaya narayan
घायाळ करणारं सौंदर्य आणि भन्नाट नृत्य यामुळे सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 24 वर्षांनी भारतात परत आली. सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर करत ही बातमी सांगितली.
ममता 200 क्रोडच्या ड्रग केसमध्ये अडकली होती. या केसमधून अखेर तिला बॉम्बे हायकोर्टाने क्लीन चिट दिली आहे त्यानंतर ती भारतात परत आली.
ममताने व्हिडीओ शेअर करत ही बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली. 24 वर्षांनी कुंभ मेळ्यासाठी ती भारतात आल्याचं तिने सांगितलं. हे सगळं सांगताना तिला अश्रू अनावर झाले.
2016 मध्ये ममताचं नाव एका हाय प्रोफाइल ड्रग केसमध्ये समोर आली होतं म्हणून ती देश सोडून केनियाला पळाली होती.
करण अर्जुन, राम लखन, वक्त हमारा है, बाजी यांसारखे तिचे अनेक सिनेमे गाजले. तिच्या डान्स आणि अभिनयाचे अनेक फॅन होते.
अनेक ड्रग केसमध्ये तीच नाव दाऊद आणि विकी गोस्वामीशी जोडलं गेलं. तिने कायमच हे आरोप नाकारले आणि ती साध्वीचं जीवन जगत असल्याचं सांगितलं.