सकाळ डिजिटल टीम
१४ फेब्रुवारीपासून वूमेन्स प्रिमिअर लीगच्या आगामी हंगामाला सुरूवात होणार आहे.
डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले असून, संघांनी सरावाला सुरूवात केली आहे.
स्पर्धा ५ दिवसांवर आलेली असताना युपी वॉरियर्स फ्रॅंचायझीने संघामध्ये मोठा बदल केला आहे.
याआधी एलिसा हिली ही युपी वॉरियर्सची कर्णधार होती.
पण तिला काढून आता अष्टपैलू दिप्ती शर्माकडे युपी वॉरियर्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दिप्तीने नुकताच उत्तर प्रदेशची पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून पदभार स्वीकारला.
त्याचबरोबर तिला २०२४मध्ये आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर तिची २०२४ मधील आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात निवड करण्यात आली होती.